
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त 14 मे 2023, रोजी सकाळी 09 ते दुपारी 02 पर्यन्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी , शस्त्रक्रिया, हृदयरोग तपासणी व सर्व रोग तपासणी , निदान शिबिराचे आयोजन करडखेड येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात तालुक्यातील सर्व रूग्ण , नागरिकांसाठी देगलुर संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आले, या वेळी उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय , उदगीर व वेद स्पर्श कार्डियार्ड हॉस्पिटल , नांदेड येथील डॉ . सचिन निलन्कर , डॉ. भारती मढवई, डॉ. सुजित येवलीकर तज्ञ डॉक्टर व त्यांची टिम यांनी शिबिरात मोठ्या संख्येने रूग्ण तपासणी केली यात वीस रूग्ण मोफत नेत्र शस्त्रक्रीयेस पात्र ठरली ……..जन्मोत्सव सोहळ्याची व शिबिराची सुरूवात संभाजी महाराज पुजन , ध्वजारोहण व जिजाऊ वंदना डॉ. सुनील जाधव यांनी गाऊन झाली , श्याम पाटील कुशावाडीकर यांना अभिवादन करण्यात आले . सूत्र संचालन डॉ.सुनील जाधव यांनी केले व शिव गीत सादर केली , प्रास्ताविक जेजेराव पाटील शिंदे यांनी केले , अनुमोदन ईश्वर देशमुख यांनी दिले , मनोगत बजरंग कोसंबे यांनी मांडले , आभार देविदास थड्के यांनी मानले , व्यवस्थापन शिवकुमार फुलारी , संतोष चीद्रावार यांनी पाहिले , अध्यक्षीय समारोप संकेत पाटील यांनी केला .या वेळी अध्यक्ष स्थानी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील होते , प्रमुख पाहुणे जिल्हाअध्यक्ष दक्षिण सुभाष पाटील कोल्हे व उत्तर परमेश्वर पाटील अल्लेगावकर , प्रदीप पाटील गुब्रे दिव्याग आघाडी जिल्हा अध्यक्ष , कमलेश कदम जिल्हा सचिव होते. प्रमुख उपस्थिती आमदार जितेश भाऊ अन्तापुरकर , माजी आमदार सुभाष जी साबने , डॉ. आकाश देशमुख , गजानन पाटील मुजलगेकर , महेश पाटील , प्रदीप पाटील हसनालकर, बालाजी पाटील थड्के , कैलास भाऊ येस्गे , राहुल पाटील शिंदे , करड्खेड सरपंच गणपत पाटील शिळवने , तंटामुक्त अध्यक्ष अहेमद कुरेशी ,नारायण बिरादार रमतापुरकर , अँड अंकुश राजे जाधव , नामदेव पाटील थड्के , अँड. रमेश जाधव , राहुल पाटील थड्के , उमाकांत भूताले , नारायण वड्जे , रणजित हिन्गोले , दत्ता पाटील , पत्रकार शशिकांत पटने, वरखिंडे शहाजी आदि सह शेकडो जिजाऊ , शिव, शंभु प्रेमी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीते साठी संभाजी ब्रिगेड चे जेजेराव पाटील शिंदे , ईश्वर देशमुख , देविदास थड्के , बजरंग कोसम्बे , डॉ.सुनील जाधव , संतोष चिदरावार , बालाजी जाधव अन्देगाव , शिवकुमार फुलारी , बाबाराव शिंदे , अनिल पाटील आदी नी प्रयत्न केले .