
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:सलग तिसऱ्या दिवशीही शनिवारी (ता.१३) मराठवाड्यातील तापमान वाढले. परभणी शहरात तर ४४.७ अंशावर सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ नांदेड ४३.२ तर बीड शहराचे ४३.० अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. इतरही प्रमुख शहरांत उष्णतेच्या लाटे सारखी स्थिती होती.भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, परभणी शहराच्या तापमानात आता वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमान वाढत आहे. बुधवारपासून (ता.१०) परभणीच्या तापमानात वाढ होत आहे. बुधवारी शहराचे तापमान ४०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यात वाढ झाली. गुरुवारी (ता. ११) शहराचे तापमान ४२.६ अंश अंशावर गेले.
शुक्रवारी (ता. १२) तापमान ४३.६ अंश इतके होते तर शनिवारी पारा अजूनच वाढला. तो ४४.७ अंश सेल्सिअसवर पोचला. परभणीचे किमान तापमानही २६.६ अंश सेल्सिअस होते. तापमान अजून काही दिवस वाढतेच राहणार असल्याचे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले.
हीटवेव म्हणजे का?
भारतीय हवामान
विभागानुसार, मैदानी
सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा
प्रदेशातल्या एखाद्या ठिकाणाचे तापमान ४० अंश जास्त, समुद्रकिनाऱ्यावरच्या ३७ अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त आणि डोंगराळ प्रदेशातल्या ठिकाणी ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त होते. तापमानात सरासरी तापमानापेक्षा ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअसने वाढ होते, तेव्हा उष्णतेच्या लाटा (हिटवेव) निर्माण होतात. सध्या मराठवाड्यातील धाराशिव वगळता इतर प्रमुख
शहरांतील तापमानात ४.५ ते ६.४ अंशाने वाढ झालेली आहे. तापमानाने ४६ अंश सेल्सिअस ही मर्यादा ओलांडली, की उष्णतेची अतितीव्र लाट निर्माण झाली, असे म्हटले जाते.