
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यात सर्वात हणेगावची ओळख आहे. या बाजारपेठेत अनेक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने असून या बाजारपेठेत महाराष्ट्र ग्रामीण बँक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बुलढाणा अर्बन बँक व केंद्र शासनाचा पोष्ट ऑफिस अशा चार वेगवेगळ्या प्रकारचे बँका याठिकाणी उपलब्ध असून या बँकाच्या असो की, पोष्ट ऑफिस असो यांच्या माध्यमातून गोरगरीब असो किंवा व्यापारीवर्ग असो यांना लुबाडण्याचे काम या बँकेतील व पोष्ट ऑफिस मधील कर्मचारी असो किंवा दलाल असो यांच्या माध्यमातून करण्याचे काम सुरू असल्यामुळे यांच्यावरून सर्वच माध्यमातील लोकांचे विश्वास उडून गेले असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, तीन ते चार वर्षापुर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पिकविमा व कर्जमाफीच्या नावावर लुटण्यात आले होते. त्याचपद्धतीने बुलढाणा अर्बन बँकेत सुद्धा अनेक व्यापा-यांच्या खात्यामधून रुपये काढून घेतल्याचेप्रकार काही व्यापाऱ्यांच्या निदर्शनास येताच अनेक व्यापारी या बँकेतून आपले खाते बंद करूनपरंतू या अशा भ्रष्टाचाराची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाली नसल्यामुळे कर्मचारी व बँकेतील रोजगारावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून शेतकरी व व्यापाऱ्यांची लूट सुरू असल्याची खंत शेतकरी व व्यापारी वर्गात व्यक्त केली जात आहे. याच चुकीचा फायदा घेत मागील एक महिण्यापुर्वी हणेगाव येथील पोष्ट ऑफीसमध्ये रुपये भरणा करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याला चुकीच्या पद्धतीने पावती देत त्या व्यापाऱ्याला गंडावल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे. परंतू अशाच पद्धतीने शेतकरी व व्यापा-यांना लूटण्याचे काम बँकेच्या व पोष्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरु असून या कर्मचारी व दलालावर कसल्याच प्रकारची कार्यवाही झाली नसल्यामुळे व्यापारी व ग्राहक चिंता व्यक्त करीत आहेत तर यांच्यावर कोण विश्वास ठेवणार अशीच चर्चा सर्वत्र चालू आहे.