
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर शेलगाव येथील बळीराजा शेतकरी गटातील सदस्यांनी पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेच्या अंतर्गत अकरा बैल जोड्या एकत्र करून 11 वखर जोडून गटातील सदस्यांची 15 एकर वर वखरणी करण्यात केली.
यावेळी छत्रपती संभाजी राजे यांची जयंती थेट शेतातील बांधावरच साजरी केली यावेळी महाराजांच्या जयंतीप्रसंगी सर्वांनी एकीने शेती करण्याचे सर्वांनी निश्चय केला.
एकत्र पद्धतीने वखरणी केल्यामुळे गटातील सर्व सदस्यांचे खुप कमी वेळात म्हणजे पाच तासात 15 एकराची वखरणी केली त्याचबरोबर गटातील अनेक सदस्यांकडे स्वतःचे बैल नसल्यामुळे वखरणीला भरपूर पैसे जात होते त्याचीही बचत झाली. यावेळी या गटामध्ये गटामध्ये गावचे सरपंच मारोतराव कदम व उपसरपंच रामेश्वर कदम यांनी स्वतः वखरणीमध्ये सर्वांसोबत सहभाग घेतला. वखरणी झाल्यानंतर गटातील महिला सदस्यांनी सर्वाना पुरणपोळी व रस या मेनुच्या जेवणाचा आस्वाद दिला.
या कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री संतोष शिनगारे, तालुका समन्वयक राजाभाऊ कदम, सतीश भिसे तर गटातील सदस्यासह गांवकरी मंडळींची प्रमुख उपस्थिती होती.