
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
लोहा तालुक्यातील मौजे मोकलेवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा नुकताच कर्तव्यदक्ष, लोकप्रिय आमदार शामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ आशाताई श्यामसुंदरजी शिंदे व शेकापचे मराठवाडा विभागीय सहचिटणीस आदरणीय विक्रांत दादा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम आमदार शामसुंदरजी शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ आशाताई श्यामसुंदरजी शिंदे व युवा नेते आदरणीय विक्रांत दादा शिंदे यांचे मोकलेवाडी गावात आगमण होताच ढोलताशांच्या, फटाक्यांच्या आतीषबाजीने जोरदारपणे जंगी स्वागत करण्यात आले.आमदार श्यामसुंदरजी शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ आशाताई शिंदे व शेकापचे मराठवाडा विभागीय सहचिटणीस आदरणीय विक्रांत दादा शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या लोकार्पण पाटीचे उद्धाटन करण्यात आले.यावेळी आमदार शामसुंदरजी शिंदे ,सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे व विक्रांत दादा शिंदे यांचे मोकलेवाडी गावकरी यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मोकलेवाडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कु.पल्लवी एकनाथ मोकले (M.B.B.S.) अमरावती, कु.प्राजक्ता सुर्यकांत मोकले (B.A.M.S.) नागपूर, व्यंकटी गंगाधर मोकले (B.S.F) गुजरात, यांचा आमदार श्यामसुंदरजी शिंदे , सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ आशाताई श्यामसुंदरजी शिंदे व शेकापचे मराठवाडा विभागीय सहचिटणीस आदरणीय विक्रांत दादा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,मी व माझी पत्नी सौ.आशा शिंदे व माझा मुलगा मोकलेवाडी व लोहा – कंधार मतदार संघाच्या विकासासाठी सदैव कटिबध्द आहोत, तुम्ही कधीही हाक मारा शिंदे परिवार विकासासाठी सदैव तत्पर असेल, आम्ही आतापर्यंत लोहा/कंधार मतदार संघाचा विकास केलेला आहे,विकास करीत आहोत, आणि याच जिद्दीने जोमाने अजुन विकासाची कामे यापुढेही करु असे सांगितले.याप्रसंगी कार्याक्रमाच्या अध्यक्षा सौ. पदमीनबाई एकनाथ मोकले, पदमीनबाई सूर्यकांत मोकले,श्याम अण्णा पवार खरेदी विक्री संघ लोहा उपसभापती, माधव पा.घोरबांड,नागेश पा.हिलाल शेकाप लोहा तालुका अध्यक्ष तथा चेअरमन खांबेगाव, आनंद लोंढे, सोनू मोरे, रावसाहेब पाटील भोपाळे, धारबा गुंडे, राजेश गुंडे, दिलीप भोपाळे, बळीराम भोकरे, व्यंकटी पाटील आढाव, पांडुरंग अंबाडे, संग्राम हत्ते, माधव मोकले उपसरपंच, सूर्यकांत मोकले, उत्तम भोकरे, श्रीनिवास पवळे, माधव मोरे, अनिल सोरगे, गंगाधर मोकले, राजेंद्र गुंडे ग्रामपंचायत सदस्य कलंबर, दिलीप पाटील भोपळे ग्रामपंचायत सदस्य कलंबर, राम गुरुजी भोकरे, गणेश मलकापूरे, प्रशांत मोरे, मारुती घोरबांड ग्रामपंचायत सदस्य उस्माननगर, सिकंदर शेख, विक्रम पाटील मोरे उपसरपंच जोशी सांगवी, दूल्हेखान पठाण सरपंच काबेगाव, संतुक मुकनर, बालाजी बोरकर सह समस्त मोकलेवाडी गावकरी मंडळी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.