
दैनिक वार्ता निलंगा ता. प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकी मध्ये भारतीय जनता पक्षाचे बसवकल्यानं विधान सभेचे अधिकृत उमेदवार शरनु सलगर हे काँग्रेस उमेदवाराचा पंधरा हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव करून त्यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे.बस्वकल्याण मतदार संघावर माजी मंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मोठा प्रभाव असल्यानेच माझा विजय झाल्याची प्रतिक्रिया आ.शरनू सलगर यानी निलंगेकर भेटी दरम्यान दिली.
बसवकल्यानं विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचार यंत्रणा प्रभावी व सक्षम पणे राबवून विजयश्री खेचून आणण्यात मोलाचे योगदान दिल्यामुळे आज नवनिर्वाचित आमदार शरनु सलगर यांनी निलंगा येथील निलंगेकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ऋण व्यक्त करून आभार मानले यावेळी निलंगेकर परिवाराच्या व भारतीय जनता पक्षाच्या वतीने फेटा बांधून शाल श्रीफळ व विठ्ठल मुर्ती देऊन देऊन सत्कार करण्यात आला.
बस्वकल्याण विधानसभा मतदार संघावर महाराष्ट्र राज्याचे माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मोठा प्रभाव असल्यामुळेच माझा विजय झाला आहे.बिदर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघाचे प्रभारी स्टार प्रचारक निलंगेकर यांच्या शुक्षम नियोजनामुळे सहा पैकी चार जाजेवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळविला आहे.असे आमदार सलगर यानी सांगितले…
विठ्ठल मुर्ती देऊन आमदार शरनू सलगर यांचा माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी निलंगा मतदार संघाच्या वतीने आपल्या निलंगा येथील निवासस्थानी सत्कार केला व पुढील कार्यासाठी सलगर याना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,शेषराव ममाळे,मनोज कोळ्ळे,विरभद्र स्वामी,डॉ किरण बाहेती,किशोर लंगोटे,किशोर जाधव,इरफान सय्यद,प्रदिप पाटील,अफ्रोज शेख,उमेश उमापुरे,पिंटू पांचाळ,बुरके अप्पा यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.