
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई- -अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर महसूल मंडळातील शेतकरी खरीप 2022 मध्ये येलो मोझ्याक आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. आम्हाला तात्काळ सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात पाटोदा ममदापूर महसूल मंडळात गेल्यावर्षी सोयाबीन सह इतर पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले होते तरीही पाटोदा महसूल मंडळातील शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत येलोमोझ्यक आणि परतीचा पाऊस यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते शासनाने नुस्कान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 अनुदान महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते दुसऱ्या पेरणीची वेळ आली तरीही पाटोदा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही आम्हाला नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ अनुदान देण्यात यावे अशी मागणी पाटोदा महसूल मंडळातील धानोरा खुर्द अंजनपुर कोपरा आदी गावातील ग्रामपंचायत आणि शेतकरी यांनी उपजिल्हाधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.