
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली : ता.17 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने,
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे नेते मा.श्री. अनिल शिदोरे, मा. श्री. राजेंद्र वागस्कर, पुणे शहराध्यक्ष मा. श्री. साईनाथ बाबर, विभाग अध्यक्ष सुनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली वडगावशेरी विधानसभा मतदार संघ, वाघोली उपविभाग अध्यक्ष पदी श्री. प्रकाश जमधडे यांची निवड करण्यात आली.
राजकारण हे वाईट आहे असे न मानता तरुणांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात येणे ही काळाची गरज आहे कारण राजकारण हे समाजव्यवस्था बदलविण्याचे एक मोठे माध्यम आहे.
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील अभ्यासू व जनसामान्याविषयी तळमळ असणारे नेतृत्व आहे. म्हणून येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वाढीसाठी चांगले योगदान देणार व ‘जगाला हेवा वाटेल’ असा सन्माननीय राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान देणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी निवडीनंतर दिली.
त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले तर अनेकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.