
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : नवनाथ वाखरडकर
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील अल्पभुधारक शेतकरी दिंगबर कोडीबा डांगे यांनी मनरेगा अंतर्गत सिचंन विहरीचा प्रस्ताव फुलवळ ग्रा.पं. कार्यालय येथे २० मार्च रोजी सरपंच व सदस्य यांच्या समक्ष ग्रामविकास अधिकारी यांच्या कडे दाखल केला होता पण त्यांनी ती दिलेली फाईल त्यांनी तसेच दिड महीना त्यांच्या टेबलवरच पडुन राहिली.
त्यानंतर दिगंबर डांगे हे अनेकवेळा
भेटले व ती फाईल पुढे पाठवली का अशी विचारना केली असता ३१ मार्च पर्यंत सिंचन विहरीचा दिलेला प्रस्ताव पाठवतो असे त्यांना ग्राम पंचायत कडून तोंडी कळवले. त्यानंतर ३१ मार्चच्या नंतर पुन्हा येथील ग्रामविकास अधिकारी यांना पाच ते सात वेळा प्रस्ताव
पाठवला का ? असे विचारना केली पण त्यांनी तो प्रस्ताव अद्याप पुढे पाठवला नसल्याने शेवटी २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिले असल्याचे दिंगबर डांगे यांनी सांगितले.
तसेच परीक्षाधिन उपजिल्हाधिकारी
तथा तहसिलदार कंधार यांना भेटुन माझी समस्या मांडली व लेखी तक्रारही दिली असल्याचे सांगितले तहसिल कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासन आपल्या दारी हा ऊपक्रम राबवित या उपक्र माच्या माध्यमातुन नागरिकाना विविध शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहे. तर दुसरी कडे मात्र शासनाचे निष्क्रिय असलेले ग्रामविकास अधिकारी शेतकऱ्यांना
नैराश्यग्रस्त करत असल्याचे दिसुन येत आहे. त्यांची सिचन विहरीचा प्रस्ताव टाळटाळ का करीत आहे यां विषयी ग्रामविकास अधिकारी यांना भ्रमनध्वनीवरुन विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगत होते, सरपंच सदस्य यांनी तर आम्ही त्यांना प्रस्ताव तयार करून पाठवा असे सांगितले असल्याचे सांगितले. संबधीत गटविकास अधिकारी यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवा असे कळहुन ही अद्याप प्रस्ताव पाठवला नसल्याचे समजते शेवटी त्या दिलेल्या तक्राराची परीक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार अनुपसिंह यादव यांनी दखल घेत संबधीत गटविकास अधिकारी यांना सिंचनविहरीचा लाभ देण्यापासुन टाळा
टाळ केल्या बाबत संबंधीतावर कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करावा असे पत्रही त्यांनी गटविकास अधिकारी व संबंधीत तक्रारदार दिगंबर डांगे यांना ता. ८ मे रोजी पत्र देऊन कळवले आहे. आता गटविकास अधिकारी संबंधीत ग्रामविकास अधिकारी यांच्यावर काय कार्यवाही करतील याकडे लक्ष लागले असून सिंचन विहरीचा लाभ देण्यापासुन टाळाटाळ केल्याबद्दल त्या अल्पभुधारक शेतकऱ्यांचा मानसीक तनाव वाढला असून नैराश्य आले आहे, माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदार ग्रामसेवक असतील असेही दिलेल्या तक्रारीत संबंधित तक्रादार यांनी नमुद केले आहे.