
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा
सन २०२२ अंतर्गत जिल्हांतर्गत मंठा तालुक्यातील ११२ शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या असून जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी १५ रोजी आदेश देवून गट शिक्षणाधिकारी यांना बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे जालना जिल्ह्यातील एकूण ११३३ शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या असून सर्व शिक्षकांना १६ रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करून १७ रोजी बदली झालेल्या शाळेवर रूज होण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मंठा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांनी सागितले.
मंठा तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी श्री सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना विभाग प्रमुख गौतम वाव्हळ, शालार्थ समन्वयक सदाशिव तोटे, श्रीनिवास जोशी, शिक्षक शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष कैलास उबाळे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राहुल काळे यांनी मोलाचे सहकार्य केले.