
दैनिक चालु वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी -किशोर फड
बीड/अंबाजोगाई–कोकणस्थांचे कुलदैवत सर्वांचे शक्तिपीठ श्रीक्षेत्र अंबाजोगाई येथील आई योगेश्वरी मंदिरात ड्रेस कोड लागू कधी होणार?
भावीकांची इच्छा.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आता देवीच्या मंदिरामध्ये ‘वेस्टर्न’ कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना ‘एन्ट्री’ बंद करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मंदिर परिसरात संस्थानच्यावतीने फलक लावण्यात आले आहेत. नुकतेच मंदिर संस्थानच्या वतीने काही बदल करण्यात आले आहेत. जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशाेभनिय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बरमुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभावानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
हेच नियम प्रत्येक मंदिरात लागू करावे अशी भाविकांची मागणी जोर धरू लागली आहे