
दैनिक चालु वार्ता उमापूर प्रतिनिधी-कृष्णा जाधव
उमापूर हे गाव खूप जास्त लोकसंख्येचा असून या गावाला तीस वर्षापासून पिण्याचे पाणी नाही. येथील लोक टँकर द्वारे विकत पाणी घेऊन पितात. तरी याकडे सरपंच,ग्रामसेवक व इतर संबंधित अधिकारी यांचे लक्षच नाही.आपला मनमानी कारभार चालवतात हुकूमशाही पद्धतीच्या कारभाराला जनता कंटाळलेली असून याकडे शासनाने लक्ष द्यावे ही मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे. पाण्याच्या टाक्या असून ही कोरड्या आहेत पाईपलाईन असूनही त्यात पाणी नाही फिल्टर गावाला असून चालू नाही. या विरोधात कोणी बोलले तर त्याला हुकूमशाही करून दबावले जाते.त्याचे घरकुल ,विहिरिचि व. इतर कामे रखडवली जातात .त्याच्यावर खोट्या कारवाया करून त्याचे तोंड बंद केले जाते. प्रशासनाला हाताखाली धरून हे लोक आपला मनमानी कारभार चालवतात महिन्यातून एकदाच पाणी सोडले की पाणी पट्टी वसूल करतात मग महिना भर पाणी नळाला येत नाही. नळाचे पाणी फक्त दिखाव यासाठीच आहे. आज पण ऊमापुर या ठिकाणी डोक्यावर एक दोन किलोमीटर हंड्याने पाणी आणावे लागते. तरीही याकडे कोणाचेही लक्ष नाही. पाण्यासाठी आलेला बजेट फक्त कागदोपत्रीच आहे. तीस वर्षापासून हे गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. तरी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक सरपंच यांना याचे काही ही घेणे नाहीका?? उमापूरच्या नागरिकांना उन्हाळा असो की पावसाळा विकतचे टँकरचे पाणी प्यावे लागते.ऊमापुर व संबंधित अधिकारी वर्ग झोपेतच आहे की काय??हा प्रश्न गावातील जनतेला पडला आहे.
सामान्य माणसाला तिनशे रु.रोज कमवावे लागते आणि शंभर रुपये तिनशे लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात.हि बाब कोनाच्याच लक्षात येत नाही का?ऊमापुर ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार उघडले पाहिजेत! हि जनतेतुन मागनि होत आहे.ऊमापुर या गावचा पाण्याचा प्रश्न मार्गि लागावा आसे ग्रामस्ता कडून सांगण्यात येत आहे.