
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
वेल्हा,जि.पुणे : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुतांश नागरिकांमध्ये आरोग्य विषयक असणारे अज्ञान, दळणवळणाची अपुरी साधने आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हा चिंतेचा विषय बनला असून त्यामुळे ग्रामीण जनता स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते किंबहुना अशा दुर्लक्षीतपणामुळे बऱ्याचदा त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते परिणामी कधी कधी जीवालाही मुकावे लागते त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृती व्हावी व प्रत्येक आजाराचे वेळेत निदान होऊन त्यावर योग्य सल्ला व उपचार मिळावेत या उद्देशाने वेल्हे येथील शिवार फाउंडेशन आणि छत्रपती सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आडवली येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे रविवारी (दि.१४) मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबीरामध्ये एकुण १४० महिला व पुरुषांची मोफत तपासणी करून प्राथमिक औषधोपचार करण्यात आले.यावेळी दिनकर धरपाळे,आनंद देशमाने अक्षय वालगुडे, दिगंबर चोरघे यांचेसह दत्तात्रय पानसरे, पंढरीनाथ पानसरे,, संभाजी इंगुळकर, उमेश दीक्षित,अनंता उफाळे,दीपक दामगुडे, गोरक्ष यादव, उमेश मालुसरे, दशरथ काटकर, कृष्णा नाक्ती, बाजीराव वालगुडे,शिवार फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाळ नाना इंगुळकर यांचेसह विविध गावचे सरपंच,उपसरपंच, आशा सेविका यांचेसह परिसरातील शेतकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. संभाजी मांगडे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी या शिबिरासाठी विशेष योगदान दिले.सुत्रसंचालन गणेश उफाळे यांनी केले.