
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी – समीर मुल्ला
शहरात आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट सुरु करणे व आवश्यकतेचे गतिरोधक निर्माण निर्माण करावेत अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे .
या निवेदनात म्हटले आहे की
दि . २९ जून 2023 रोजी आषाढी यात्रा पंढरपूर येथे होत आहे तत्पूर्वी आपल्या कळंब शहरांमध्ये संत गजानन महाराज शेगाव श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचे सह छोट्या-मोठे जवळ पास दोनशे वर शहरात पालख्या या दाखल होतातअसंख्य पालखी शेगाव पंढरपूर या मार्गावरून कळंब शहरातून पंढरपूर कडे जातात गजानन महाराजांची पालखी शहरांमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मुक्कामी असते पालखीचे दर्शनासाठी तालुक्यातूनच नव्हे तर जवळील लातूर बीड येथून भाविक मोठ्या संख्येने दर्शन साठी येतात या पालखीचा मुक्काम कळंब नगर परिषद शाळा क्रमांक 1 येथे असतो येथे पालखी मुक्कामी असते तेथे पथ दिवे बसविण्यात यावेत या भागात साफसफाई करण्यात यावी तसेच शहरातील सर्व मंदिर परिसरातील नेहमी साफसफाई करण्यात यावी तेथील पथ दिवे सुरू करण्यात यावे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी तसेच मंदिर परिसरातील व शहरातील शौचालय सुरू करण्यात यावी त्याच प्रमाणे कळंब शहरातील जाणारा शेगाव पंढरपूर पालखी मार्गावर अपघात होऊ नये म्हणून खालील ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग सह कमी उंचीचे गतिरोधक निर्माण करून 30 किमी प्रति तास वेग मर्यादेचे बोर्ड लावण्यात यावेत
1) उपजिल्हा रुग्णालय समोर 2) बस स्थानका समोर 3) डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक 4) छत्रपती शिवाजी महाराज चौक 5 )अहिल्यादेवी होळकर चौक 6)शासकीय धान्य गोदाम समोर 7)पंचायत समिती कार्यालयासमोर 8)उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर 9) पोलीस स्टेशन कळंब समोर 10) जिल्हा न्यायालय समोर 11) एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर
12 डॉ . ढेंगळे हॉस्पिटल समोर तसेच शासकीय धान्य गोदामा समोर हावर गाव कडे जाताना रस्त्याचे दोन्ही बाजूला नाली उघडी आहे व मोठे खड्डे आहेत त्या ठिकाणी वाहन नालीत जाऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे ते खड्डे तात्काळ पुजण्यात यावेत असे खड्डे इतरत्र कोठे असतील तर संबंधित विभागाला सांगून बुजवण्यात यावे शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरु करण्यात करून झाडाच्या वाढलेल्या फांद्या एम.एस.ई.बी. मार्फत कट करून घ्यावे जेणेकरून झाडाच्या फांद्याचे घर्षण विद्युत तरणा होऊन विद्युत पुरवठा खंडित होणार नाही व भावीक भक्तांची व शहरातील नागरिकांची पालख्यांच्या येण्याच्या आधी व पावसाळ्याच्या तोंडावर गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी उप्रिक्त विषयावर तुमच्या अध्यक्ष तेखाली संबंधित विभाग चे प्रमुख अधिकारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन आणखीन कुठल्याही कळंब शहरातील अडीअडचणी असतील तर आषाढी वारी सुरू होण्याआधी आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या वारकऱ्यांच्या जीविताशी निगडी सर्व प्रश्न तात्काळ मार्गे लावावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
या निवेदनावर ॲड. मनोज चोंदे , दत्ता कवडे, पृथ्वीराज देशमुख परशुराम देशमाने, आकाश जाधव देशमुख ,परमेश्वर हौसालमल,अजित गुरव , ज्योतीताई सपाटे ,कमलाकर पाटील ,बाळासाहेब कथले ,बंडू आबा ताटे ,विशाल मिटकरी, प्रशांत पडवळ यांच्या सह्या आहेत .