
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा तालुक्यातील पारडी येथील विक्की गार्डन येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे दोन दिवशीय
प्रशिक्षण संपन्न झाले अंशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे लोहा तालुकाध्यक्ष सतीश आणेराव यांनी दिली.
लोहा तालुक्यातील पारडी येथील विक्की गार्डन मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या ५०० पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय दि.२३ व २४ मे २०२३ रोजी दोन दिवशीय निवासी प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी प्रा.अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीचे ध्येय धोरणाची माहिती दिली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य नेते सर्वजीत बनसोडे, राजेंद्र पातोडे, प्रा.गोविंद दळवी , फारुख अहमद, जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले , युवा जिल्हाध्यक्ष धीरज भैया हाके, सुरेश सिरसाट, सिध्दार्थ मोकळे, भालचंद्र भरड, अशोक हिंगे पाटील, संघरत्न कुरे, सुरेश शेळके, नागोराव पांचाळ, यांच्यासह जिल्हा ,तालुका पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार आघाडी, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . अशी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश आणेराव यांनी दिली.