दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी :-समाधान कळम.
वडोद तांगडा. मेव्हण्याच्या तेरावीचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना,भोकरदन जाफ्राबाद रस्त्यावरील आन्वा फाट्याजवळील शरद ट्रेक्टर शोरूम समोर बस-दुचाकीची समोरासमोर धडक होऊन त्यात देहड येथिल दिलीप शेनफड बावस्कर (वय 32) हा युवक ठार झाला. देहड येथिल दिलीप शेनफड बावस्कर हे मंगळवारी ( दि.23) रोजी भोकरदन तालुक्यातील विटा(रामनगर) येथे मेव्हण्याच्या तेरावीचा कार्यक्रम साठी गेले होते रात्री विटा येथे मुक्कामी राहिल्या नंतर ते दुसर्यां दिवशी,बुधवारी (दि.24) सकाळीच ते देहड येथे जात असताना भोकरदन-जाफ्राबाद रस्त्यावरील आन्वा फाट्याजवळील शरद ट्रेक्टर शोरूम समोर स्प्लेंडर क्र.MH 21 AZ 9262 आणि बस क्रमांक.MH 40 Q 6447 मलकापूर-पुणे याची समोरासमोर धडक झाली बसच्या जोराच्या धडकेत युवक दिलीप बावस्कर हे मरण पावले. 13 दिवसांपूर्वी भावाच्या दु:खद निधनानंतर पतीचे अपघातात निधन झाल्याने कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.


