
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्याच्या टोकावर
असलेल्या बेलोरा चौफुली -वझर सरकटे सरहद्दी पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.मंठा तालुक्यातील बेलोरा, वझर सरकटे, भुवन, पोखरी मराठवाड्याच्या जिल्ह्याच्या व तालुक्याच्या टोकावरील गाव आहे. या गावांना तालुक्याला जोडण्यासाठी एकमेव मार्ग असुन विदर्भात जाण्यासाठी सरळ आणि सोपा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याने रहादारी खूप अस्ते येथील नागरिकांना,शेतकऱ्यांना शेतातील माल वाहतूक, ये-जा त्याच रस्त्यांनी करावी लागत आहे. गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत आहे.
याच रस्त्यावरून रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक, टिप्पर ये-जा करत असल्याने रस्त्याची वाट लागली. जागोजागी रस्ताउखडल्याने व जीवघेणी खड्डे पडल्याने वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून धोका पत्करून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. रस्त्याची दुर्दशा होऊनही प्रशासनासह लोकप्रतिनिधी मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकडून संताप व्यक्त केला जात आहे. सदर रस्त्याची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी केली जात आहे.