
दैनिक चालु वार्ता कौठा सर्कल प्रतिनिधी -प्रभाकर पांडे
कंधार तालुक्यातील छोटस गाव काटकळंबा येथील जि.प. हायस्कूलचे तीन विद्यार्थी इस्त्रो सहलीसाठी निवड करण्यात आली होती एकीकडे जिल्हा परीषद शाळेची विद्यार्थी संख्या घसरणीवर असली तरी काही शाळा याला अपवाद ठरत आहेत त्यातीलच काटकळंबा येथील विद्यार्थी आशित धनाजी चावरे कु.धनश्री विजय गोरकवाड कु. राजश्री प्रकाश बस्वदे या तिन विद्यार्थ्यांचा इस्त्रो अंतरीक्ष केंद्र श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश टेक्नीकल म्युझीयम बंगलोर थुंबा स्पेस म्यूझीयम तिरुअनंतपुरम येथे जाऊन यशस्वी अभ्यास दौरा केल्या बदल गावकऱ्यांनी सत्कार समारंभ आयोजीत केला होता या कायक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य मा.श्री पानपट्टे सर होते प्रस्तावीक उमाकांत हात्ते सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्याख्याते पवार सर यांनी केले त्यावेळी आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे हाम्पले सर सदाशिव हात्ते सर चिद्रावार सर वडजे सर उपलंचवार मॅडम मिसे सर गायकवाड सर गिनेवाड सर पवळे सर चक्रधर सर सह शाळेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थीनी पालक व गावातील नागरीक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.