
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
लातुर/अहमदपुर: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त तब्बल आठ वर्षांपासून श्री क्षेत्र माळेगाव यात्रा ते श्री क्षेत्र चोंडी इथ पर्यंत जाणारी रथ यात्रा माजी.जिल्हापरिषद सदस्य संभाजी गोविंदराव धुळगुंडे ,ॲड.शिवाजीराव हाके,इंजि.बालाजीराव काळे, प्रा.मुरहरी कुंभारगावे,निलकंठ उराडे,प्रा.संजीव म्हेत्रे, किशनराव टेकाळे,गोविंद गोरे,ह.भ.प.उद्धव महाराज आणी इतर सहकारी मंडळीच्या माध्यमातून हा अलोकिक असा अहिल्यादेवी मातेचा सोहळा अहमदपुर नगरीत आला असता अहमदपुर येथील अहिल्या भक्तांनी सर्व प्रथमतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेच पूजन करून विनम्र अभिवादन केल.त्या नंतर या रथ यात्रेचे प्रमुख सर्व सदस्य आणी कार्यकर्ते महिला भगिनी यांचा सत्कार करण्यात आला .सर्व यात्रेकरू कार्यकर्ते मंडळी साठी फराळाची ,भोजनाची सोय करण्यात आली होती.या रथ यात्रे साठी पुढील प्रवासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी आंनद देवकते, प्रा.डॉ. गोपाळ माने,,डॉ.टोम्पे सर धुळगुंडे अनिल सर,पत्रकार विष्णु पोले, भालेराव सर,नाईक सर,रामदास हाके,बालाजी पारेकर,व्यंकटी इप्पर, ओम धुळगुंडे,ऍड. नाथराव देमगुंडे,व्यंकटी सुरनर,धोंडिबा वाघमारे,आणी इतर सर्व अहिल्या भक्त उपस्तिथ होते.