
दैनिक चालु वार्ता लातूर प्रतिनिधी -संतोष भसमपुरे
शेतकरी आणि महावितरण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जात आहे ,यांचे मुख्य कारण म्हणजे शेतकरी वर्गात वाढत चाललेली जागृती आणि न्यायासाठी लढा देण्याची निर्माण होत असलेली संघटित भूमिका .
मौजे बोरगाव काळे येथील शेतकऱ्यांनी महावितरण च्या मनमानी कारभार आणि तुघलकी वर्तुवनुकीला कंटाळून रोहित्राच्या मागणीसाठी बोरगाव काळे येथे राष्ट्रीय महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन केले.
सविस्तर वृत्त असे की मौजे बोरगाव काळे येथील शेतकरी वर्गाने गेल्या दोन वर्षापासून महावितरण च्या मुरुड येथील उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे वीजबिल आणि विजेच्या वापर यासंबधी माहिती मागवली होती .परंतु सदर कार्यालयाकडून आजतागायत या पत्राच्या अनुषंगाने कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे उघड झाले .आणि कुठलीही माहिती जसे छापील वीजबिल आणि शेतकऱ्यांनी केलेला विजेचा वापर यासंबंधी माहिती शेतकऱ्यांना दिली नाही ,त्याउलट सक्तीने वीज कनेक्शन कट करून वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना मजबूर केले .
राष्ट्रीय किसान मोर्चा या राष्ट्रीय संघटनेने शेतकरी वर्गात केलेल्या जनजागृती मुळे शेतकरी वर्गाने संवैधानिक मार्गाने लढा देण्याचे ठरवून दोन वर्षापासून पाठपुरावा केला त्यात असे घडले की एका शेतकरी गटांची डीपी म्हणजेच लाईट ट्रान्सफॉर्मर जळाला ,त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर च्या मागणी करीता गेले असता पुन्हा तोच वीजबिल भरण्याचा पाठ अधिकारी वर्गाने सुरुवात केला.त्याच अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन केले.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे फक्त तोंडीपुरान असून जो त्रास शेतकऱ्यांच्या जीवनात आहे तो मात्र समाजाला व राजकीय नेत्यांना दिसत नाही.
महावितरण कडे शेतकऱ्यांच्या विजवापराचा हिशोब नाही ना कोणता आकडा नाही ना त्यांच्या वापराचे युनिट नाहीत .तरीही कोणत्याही कायदेशीर आधार नाही तरीही सक्तीने वीजबिल वसूल करत आले आहे .
महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विजबिलापोटी महावितरणला हजारो कोटी रुपये दरवर्षी भरत असून ते महावितरण च्या कोणत्याही अधिकाऱ्यांना माहिती नाही .
आठ तासाचे वीजबिल सरकार भरते आणि शेतकऱ्यांना वीजपुरवठा ही आठ तासाचाच होतो .मग हे बिल मागतात कुठले असा प्रश्न राष्ट्रीय किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष दिपक इंगळे यांनी मांडला आहे .तसेच शेतकऱ्यांनी वापर केलेला विजेचे बिल द्या आम्ही बिल भरू अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे .
तरीही महावितरण कडे त्यांच्या प्रश्नांचे उत्तरे नाहीत आणि विजवापराचे युनिट आणि आकडे ही नाहीत .
त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय किसान मोर्चा संपूर्ण राज्यभर जेल भरो आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय किसान मोर्चा आणि शेतकरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.