
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा.दवणे
मंठा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. योगानंद शिक्षण संस्थेच्या जयभवानी मा. व उच्च मा. विद्यालय जयपूर ता मंठा विज्ञान शाखेचा. ९७.१८% टक्के व कला शाखेचा ९०% निकाल लागला असुन विज्ञान व कला शाखेतून अनुक्रमे प्रथम द्वितीयआणि तृतीय क्रमांकाने कु. श्रुती अजित काळे ७४%, चि. युवराज दत्तात्रय काजळे ६९%, चि. योगेश परमेश्वर काकडे ६८.६७ कला शाखेतून चि. अक्षय राजू राठोड ६८%, कु. अंजली जगन पवार ६६.६७%, चि.अंगद दत्ता नळगे ६५.३३% , गुण घेऊन अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने यश संपादन केलेले आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयातील मुलींनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. या यशाबदल योगानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सी. जी. पाटील विद्यालयाचे प्राचार्य श्री बुरांडे सर, एस डी काकडे सर, एस आर पाटील,सोनवणे सर, थोरवे सर, प्रधान सर, तुरेराव सर, नितनवरे सर,काळे सर,मस्के सर, गाडेकर सर,उबाळे सर,वायाळ सर,व्ही एस काकडे सर, खोसे सर,घुले सर,पवार सर, कायंदे सर, कळंबे सर,आडे सर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.