
दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी – भारत पा.सोनवणे –
वैजापूर- आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यामधील एकूण28 हजार ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावांमधील दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” हिराबाई राशिनकर, विजया वाणी यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र ,रोख स्वरूपात 500 रुपये व सोनाली इंगळे, अश्विनी इंगळे, सविता राशिनकर, सरस्वती इंगळे यांना माता अहिल्यादेवी यांचे फोटो ग्रामपंचायत स्तरावर देऊन गौरविण्यात आले. या वेळी लोणी गावचे विकास पूरुष कृ.उ.बा.स.संचालक श्री गणेशभाऊ पा. इंगळे, सरपंच कावेरी ताई इंगळे, सदस्य- हरिभाऊ राशिनकर, लखन मस्के, रामेश्वर इंगळे, संदीप इंगळे, अण्णाभाऊ इंगळे, मच्छिंद्र इंगळे व गावकरी यांनी उपस्थित राहून स्री शक्तीचा मानसन्मान वाढविल्याबद्दल ग्रामपंचायत लोणी बुद्रुक व ग्रामस्थांकडून राज्य शासनाचे मनःपूर्वक धन्यवाद केलेत