
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरातील शारदानगर भागात बुधवारी दुपारी घेतलेला लाकडाचा कुंदा मी घेतलेला नाही असे म्हणत आरोपीने कटरने एकाच्या गळ्यावर वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय परिसरातील सोहेल रसुल कुरेशी (रा. शारदानगर, देगलूर, वय २०) यांचा चिकन व मटन विक्री करण्याचे दुकान आहे. सोहेल कुरेशी हा दहावी वर्गात शिकत असुन सध्या सुटी असल्याने तो दुकानात बसत होता. दि. ३० मे रोजी शादुल सलीम शेख याने मटन कापण्याचा लाकडाचा कुंदा सोहेलकुरेशी याच्याकडून घेऊन गेला होता. बुधवारी सोहेल कुरेशी हा घराकडून बाजारात जात असताना शादुल शेख हा रा. शारदानगर देगलूर येथील त्याच्या घरापुढे उभा होता. काल घेतलेला लाकडाचा कुंदा सोहेल कुरेशी हा परत मागितला. तेव्हां मी तुझा कुंदा घेतलेलाच नाही तर मीकुठुन देवू असे म्हणत त्याने शिव्याची लाखोली वाहण्यास सुरवात केली. तू येथून गेला नाहीस तर तुला खत्म करून टाकीन अशी धमकी देत शादुल शेख याने सोहेलच्या गळयावर कटरने वार केला. तेव्हां प्रेमसाई शिवाजी रोयलावार व जमीर महेताबसाब कुरेशी यांनी सोडवा सोडवी केली अन्यथा अप्रिय घटना घडली असती. सोहेल कुरेशी याच्या फिर्यादीवरून आरोपी शादुल शेख याच्याविरोधात ३२४, ५०४, ५०६ अन्वये देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास जमादार राजाराम मिरदोडे करीत आहेत.