
अर्चना ताई दुधकोर मॅडम हे शांत स्वभाव असणारी शिक्षिका
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी :- प्रदिप मडावी
कोरपना तालूका आवाळपूर
आवाळपूर:- आवाळपूर येथील केंद्र क्र ४ इथे योग दिवस साजरा करण्यात आला लहान मुले म्हटलं की उद्याचं भविष्य घडविणारे मुलं किंवा देवाघरची फुले अशी वेग वेगळी उपमा आपण त्यांना देत असतो,
पण त्याच लहान मुलांना उद्याचं भविष्य घडविण्यासाठी तयार करणारे ते म्हणजे शिक्षक या पेक्षाही जास्त महत्वाचे म्हणजे लहान मुले निरोगी राहणे व त्यांच्या शरीराची वाढ चांगली होणे गरजेचे आहे,
आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून
ला जगभरात साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी यांना मान्यता दिली आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव सादर केला होता आणि तो प्रस्ताव मान्य हि झाला तेव्हापासून २१ जुन हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो,
म्हणून आज आवाळपूर केंद्र क्र ४ इथे हा योग दिवस साजरा करण्यात येत आहे दुधकोर मॅडम यांनी कोणता पोषण आहार द्यायचं व कोणत्या वेळेस द्यायचे व मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय काय उपाय योजना केल्या पाहिजेत असे खूप छान मार्गदर्शन मुलांच्या पालकांना केले तसेच पालकांनी सुध्दा अर्चना ताई दुधकोर मॅडम यांच्याबद्दल एक प्रेमळ आणि शांत स्वभाव असणारी शिक्षिका आहे तसेच लहान मुलांना खूप छान शिक्षण देतात व त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी शाळेमध्ये करून घेतली जाते व चांगल्या प्रकारचे पोषण आहार मुलांना खायला देतात असे मनोगत पालकांनी व्यक्त केले,
या प्रसंगी प्रेमीलाताई तुमराम, रेखाताई कांबळे, शरदजी शेंडे, सपनाताई आत्राम, सुनिता ओहळ, श्रध्दा ओहळ, शुब्रा तुमराम, देवांशी शेंडे, अशे अनेक अंगणवाडी विद्यार्थी व पालक वर्ग आजचा योग दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते…