
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण आज इंदापूर मधल्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडले.
इंदापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात डोळ्याचं पारणं फेडणारं दुसरं रिंगण पार पडलं.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवंडीत पार पडलं आहे. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. तर आज इंदापूर येथे तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण पाहायला देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार, बारामती ग्रामीण चे विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, भाग्यश्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन भरत शहा,माझी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील -ठाकरे, युवा नेते राजवर्धन पाटील, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे, कैलास कदम, उदयसिंह पाटील, अरविंद वाघ, विलास वाघमोडे, इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, काँग्रेस नेते तानाजी भोंग, स्वप्निल सावंत, शेखर पाटील, धनंजय बाब्रस आदी मान्यवर उपस्थित होते.
काय आहे गोल रिंगण?
गोल रिंगणामध्ये पालखीभवती नागरिक मानवी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकर्यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वाराकर्यांची गर्दी असते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात.