
दै.चालू वार्ता
चाकूर ग्रामीण प्रतिनिधी किशन उध्वराव वडार
चाकूर – येथील चाकूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरविंद बिराजदार यांची तर सचिवपदी विनोद निला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
चाकूर तालुका केमीस्ट अँन्ड ड्रगीष्ट असोसिएशनच्या पदाधिकारी निवडीची बैठक जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तथा निवडणूक निरिक्षक अंकुश भोसले अरुण सोमाणी यांच्या उपस्थितीत गुरुवार दि.२२ रोजी संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर बस्वराज वाडकर, अनिल चव्हाण, बालासाहेब पांडे, सुधाकर तरगुडे, विश्वनाथ कस्तुरे आदी उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष पदी अरविंद बिराजदार, सचिव पदी विनोद निला,उपाध्यक्षपदी महेश पेन्स्लवार, बालाजी महाजन, गोवर्धन वट्टमवार, तर सहसचिव सुरज शेटे,कोषाध्यक्ष मुक्तदिर जहागीरदार,समन्वयक म्हणून समीर लखनगावे,सदस्य म्हणून सोपान शिंदे, संतोष पाटील,विश्वप्रताप सुर्यवंशी, चंद्रशेखर सांगवे, राजकुमार बलशेटवार यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी नुतन अध्यक्ष ,सचिव व सर्व कार्यकारिणीचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी विजय कोरे, वसंत भोसले, संदीप बारुळे, गणेश स्वामी, परमेश्वर हालकुडे, नागेश स्वामी, पांडुरंग बेजगमवार,दिपक कांबळे यांच्यासह तालुक्यातील केमिस्ट व ड्रगीस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.