
दैनिक चालू वार्ता
अहमदपूर शहर प्रतिनिधी हाणमंत जी सोमवारे
अहमदपूर प्रतिनिधी :- अहमदपूर शहरातील अंबिका काॅलनी येथील वास्तव्यात असलेलं स्नेही गंगाधर साखरे हे मुळचे मु पो शिवणखेड ता अहमदपूर येथे प्राथमिक शिक्षण पुर्ण करुन हुशार व बुद्धीच्या जोरावर नवोदय विद्यालय लातूर येथे प्रवेशित होऊन पुढील शिक्षण 5वी ते 10वी पर्यंत पुर्ण केलं.त्यांनंतर 11वी व 12वी महात्मा फुले विद्यालय अहमदपूर येथे पुर्ण करुन 12 वी चांगल्याप्रकारे मार्क घेऊन डि एड परीक्षा उत्तीर्ण झाले, नंतर समता शाळा अहमदपूर येथे माध्यामिक शिक्षक म्हणून कार्यरत असुन आपले पुढील शिक्षण बहिस्थपणाने बि.ए.बि.एड.व एम.ए. एम.एडच शिक्षण पूर्ण केल.एम.ए.शिक्षणाच्या जोरावर पेट परिक्षा पास होऊन इंग्रजी विषयात पि एच डी प्राप्त केलं आहे, हे सर्व शिक्षण पूर्ण करण्यासाठी कठिण काळांत लागलेलं सहकार्य घरचे सर्व सदस्य व शाळेतील शिक्षक वृंद, समाजातील बुध्दीवंत मित्रपरिवार याच्यामुळे हि पदवी प्राप्त झाली असे त्यांनी त्यांच्या मनोगतातुन व्यक्त केले आहे,तरसम्राट मित्र मंडळ व मित्र परिवाराच्या वतीने शाल पुष्पहार देवून त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजीत गायकवाड हे होते तर या वेळी सामाजिक कार्यकर्ते अनू.जाती मोर्चाचे तालूकाध्यक्ष रमेश लेंडेगावकर,पत्रकार नरसिंग सांगवीकर,शिक्षक वाघमारे सर, एस.एल.जाधव,लहूजी शक्ती सेनेचे तालूकाध्यक्ष मुकुंद वाघमारे,शिक्षक नेते गिरीष गोंटे,दिगंबरराव वाघ मारे,क्षिरसागर भैय्या अंधोरीकर श्री सोमवारे एच जी सर , लहुजी साळवे कर्मचारी महासंघ तालुका कोषाध्यक्ष व आदींची उपस्थिती होती.या प्रसंगी युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.तर सुजीत गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विलासराव चापोलीकर यांनी केले तर सचिन बानाटे यांनी आभार व्यक्त केले.