
दैनिक चालू वार्ता
अहमदपूर शहर प्रतिनिधी हाणमंत सोमवारे
अहमदपूर :-राजश्री शाहू महाराज जयंती आज दिनांक 26 जून 2023 रोजी लहुजी साळवे कर्मचारी महासंघ शाखा अहमदपूरच्या वतीने आरक्षणाचे जनक, स्त्रियांचे उद्धार करते, जाणता राजा, सामाजिक न्यायाचे प्रणेते राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्य लसाकम चे जिल्हा प्रवक्ते श्री वाघमारे डी.एस.सर, शाहू महाराज यांनी केलेल्या समाजप्रबोधन कार्याचं उलगडा केलें तर लसाकमचे जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश भालेराव सर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित विवेचन,विषयी सखोल अशी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी अहमदपूरचे तालुका अध्यक्ष डॉ, गंगाधर साखरे, विद्यमान सचिव गणेशजी वाघमारे, सहसचिव चंद्रकांत जंगापल्ले, कार्याध्यक्ष सुग्रीज बेले, ज्येष्ठ सल्लागार नरसिंग कांबळे मामा, श्रावण दादा वाघमारे, हाणमंत सोमवारे सर ,राजू हरगिले इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थित संपन्न करण्यात आला..