
महसूल अधिकारी मस्त व प्रशासन कोमात…!!
दै.चालू वार्ता
उमापूर,प्रतिनिधी कृष्णा जाधव
उमापूर/राक्षस भुवन मधील गोदावरी नदीपात्रातील अवैध्य वाळू उपसा आणखीही जोमात सुरू आहे,
सरकारी परवानगीने जसा वाळू उपसा सुरू होतो त्याचप्रमाणे अवैध्य वाळू उपसा सुरू आहे, कारण गोदावरी नदीपात्राचे वारिस कोणीच नाही, सर्रास पणे हजारोब्रास वाळू चोरून विकली जाते.
महसूल अधिकारी व प्रशासनाच्या नाकासमोरून हि वाळू चोरी होत आहे. गोदावरी नदीपात्रात असे पाच पाच फुटाचे व जास्तीगोदावरी नदीपात्रात असे पाच पाच फुटाचे व जास्तीचे खड्डे वाळू उपसण्यात येऊन पडले आहे, दिवस व रात्र हि वाळू उपसण्यात येत आहे, महसूल अधिकारी याकडे लक्षच देत नसल्यामुळे हा प्रकार घडतोय,
पण महसूल प्रशासन शांत का बसलेल आहे, हे कोणालाही समजेना
से झाले.दिवसातून किती ब्रास वाळू चोरीला जाते याचा काही हिशोब प्रशासनाला आहे का असा सवाल जनतेतून होत आहे, संबंधित महसुलाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
महसूल अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे असे प्रकार घडून येत आहे.गेवराई मार्गे, सुळेगाव मार्गे,उमापूर मार्गे, ठाकरवाडी या रस्त्याची अशी भयानक दुरावस्था या वाळूच्या ठेकेदारांनी केली असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
आहे.
शासनाचे वाळू डेपो कोठे गेले हे कोणालाच माहीत नाही
कारण शासनाचाच वाळू डेपो चोरीला गेला की काय हा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे
सर्रासपणे दिवस रात्र वाळू चोरणाऱ्यांवर कधी कारवाई होईल असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे
वाळू माफ यांच्या डोक्यावर कोणाचा हात असेल, की निर्भयपणे वाळू चोरी व वाळू उपसा करतात
गोदावरी वाळू चोरी सामान्य माणसाला न परवडणारी वाळू बे भाव विकली जाते,तरी प्रशासनाचे लक्ष कोठे आहे,
याकडे महसूल अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणेआता खूप गरजेचे ठरले आहे.कारण गोदावरी हक्काची वाळू सामान्य जनतेला शासनाच्या भावात मिळेल का असा प्रश्न निर्माण होत आहे शासनाच्या भावापासून जनता आता खूप दूर आहे असे वाटू लागले
एका दिवसात महसूल शासनाचा किती बुडतो याकडे कोणाचे लक्ष नाही
या प्रकरणात महसूल मंडळाचा तातडीने निर्णय घेण्याची गरज