
दै.चालू वार्ता.
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम
भोकरदन : वडोद तांगडा येथे मृग नक्षत्रावर खरीप हंगामातील पेरण्या केल्या जातात. मात्र मृग नक्षत्र सुरू झाले तरी पेरण्या नाहीत. याववेळी उन्हाचा तडाखा कमी प्रमाणात जाणवू लागला आहे. पाऊस हुलकावणी देत आहे. पाऊस नसल्याने मशागती ठप्प आहेत. त्यामुळे यावर्षीचा मृग नक्षत्रातील खरीपाचा पेरा हुकला आहे. पावसाच्या आगमनानंतर मशागती होऊन पेरण्या होतील. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. तालुक्यातील सुमारे १६ हजार हेक्टर वरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. तालुक्यातील अनेक ठिकणी पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत आहेत तसेच वडोद तांगडा येथे नदीलगतच्या विहरी देखील कोरड्या पडल्या व पाणीसाठा खालावला आहे. परिणामी, बळिराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
जून महिना संपला तरी पावसाचे आगमन झाले नाही. गतवर्षी खरीपाच्या पेरण्या जूनमध्ये झाल्या होत्या. दरवर्षी उन्हाळ्यात पडत असलेल्या मोठ्या पावसामुळे खरीपपूर्व शेतीच्या मशागती होत. मात्र यावर्षी उन्हाळी पाऊसही पडला नाही. मृग नक्षत्रावर शेतकरी हायब्रीड ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, चवळी, तूर, सुर्यफूल, सोयाबीन, मटकी या पिकांची पेरणी करत असतो. सध्या ऊन, आभाळाचा खेळ सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात बखारीमध्ये खताचे ढिग मारले आहेत. पावसाअभावी मशागती खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पाऊस पडेल या आशेवर काही शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागती करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे गावातील व तालुक्याच्या ठिकाणी असलेली कृषी सेवा दुकाने ओस पडू लागल्याचे चित्र आहे.
तलावातील पाणीसाठा खालवला
शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते अद्यापही खरेदी केली नाहीत. त्यामुळे कृषी दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत. तालुक्यातील शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पहात आहेत. पाऊस पडल्यानंतरच खरीपाच्या पेरण्या होणार असल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. तालुक्यात असणाऱ्या तलावातील पाणीसाठा खालवला आहे. सर्वाधिक कमी पाणीसाठा आता शेलुद धरणातील तलावात होत चालला आहे. अन्य तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. दोन ते तीन महिने पुरले इतपत पाणी साठा आहे.
विहरीतील पाणी उपसामुळे पाणी संपल्यामुळे बागायती पिके धोक्यात :
तालुक्यात बागायत पिकांना जीवदान ठरलेल्या मिरची , मक्का, सरकी, सिंचन योजनेतून संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ठिंबकसिंचन व तुषार सिंचन द्वारे पाणी शेती मालास देण्यात येत आहे त्याचा फटाका दुष्काळी तालुक्यात पिकांना बसत आहे. पाण्याअभावी तालुक्यातील मिरची सरकी, भाजीपाला यासह अन्य पिके वाळून जाण्याची शक्यता आहे.