
दै. चालु वार्ता उपसंपादक
पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता क्राईम कॅपिटल म्हणून होते की काय असं चित्र निर्माण झालं आहे. कारण मागील काही दिवसात पुण्यात घडलेल्या घटनांनी अक्षरशः महाराष्ट्र हादरला आहे. कधी बलात्कार, प्रेमातून हत्या, गाड्यांची तोडफोड तर कधी अल्पवयीन मुलांकडून होत असलेली अमली पदार्थांची विक्री… या सगळ्या घटना पाहून पुण्याची प्रतिष्ठा जपली जाणार कि नाही अशी चिंता वाटतेय. संपूर्ण शहरात दहशत निर्माण झाली. असुरक्षिता वाढली असून नागरिक भयेच्या छायेखाली वावरत आहेत.
दोन तीन महिन्यांत विविध गुन्ह्यांच्या आठ घटना घडल्या आहेत.
सलग तीन दिवस कोयता गँग ने पुण्यातील वेगवेगळ्या परिसरात किमान ८० गाड्या फोडल्या, दर्शना पवार हत्या प्रकरण, स्पीकरच्या आवाजावरुन निर्माण झालेला वादात अपमानित झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली, पुण्यात अल्पवयीन मुलं चैन आणि मौजमजेसाठी अंमली पदार्थ विकत असल्याचं मागील काही दिवसात समोर आलं आहे. आईने अल्पवयीन मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा,
हुंड्यावरुन वाद विकोपाला गोल्याने एका २१ वर्षीय तरुणाला मानवी विष्विष्ठा खायला भाग पाडले, एकतर्फी प्रेम, तरुणीचा नकार अन् तीन राजकीय नेत्यांना धमकीचे फोन वरून खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा घडला. तसेच एका रिक्षा चालकाने तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता पुण्यात मुलीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झालं आहे.
अशा विविध घटनांमुळे पुण्याचे स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे परराज्यातील व प्रदेशातील लोक पुण्याकडे वेगळ्या नजरेने पहात आहे.
त्यात राज्यकर्ते सत्तेसाठी घाणेरडे राजकारण करण्यातच मश्गुल आहेत. त्यामुळे पुणे शहराला कोणी वाली राहिला नाही, असे वाटते.