
दै.चालु वार्ता
उपसंपादक शाम पुणेकर
पुणे महापालिकेकडून शहरात प्रत्येक गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र, उद्या आषाढी एकादशी आणि ईद असल्याने या दिवशी शहरात पूर्ण वेळ पाणी देण्यात येणार आहे. शहरात कुठेही पाणी बंद ठेवले जाणार नाही. अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी कळविले.
गुरूवार दि. २९ जून रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच वेळी येत असल्याने पाणीपुरवठा सुरू ठेवण्याबाबत विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुणे मनपाला निवेदन दिले होते. त्यानुसार गुरूवारी पाणी चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे पुणेकरांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले.