
१ वर्षाकरीता स्थानबध्द…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) : आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात आकाश नाना पुंडकर (२७, रा.वरूड कूलट ता.दर्यापूर) यास एमपीडीए अन्वये एक वर्षाकरीता जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.कुख्यात गुंड आकाश पुंडकर विरूध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच तडीपार कारवाई देखील करण्यात आली.परंतु त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता.तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तो वारंवार गुन्हे करीत होता.त्याची दखल घेऊन त्याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा,याकरीता पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे सादर केला.तो धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने जिल्हादंडाधिकाऱ्यांनी त्यास एक वर्षाकरीता अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश आज २८ जून रोजी पारीत केला.