
दै.. वार्ता
अंबाजोगाईप्रतिनिधी बीडअंबाजोगाई
अंबाजोगाई शहरातील जिजाऊ विद्यालय या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांची वारकरी दिंडी संपन्न झाली. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी सह संतांची व वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती. या दिंडीची सुरुवात जिजाऊ शाळेतून झाली व हिंदमाता चौक मार्ग जागृती हनुमान मंदिर एलआयसी कॉलनी येथे पोहोचली शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वारकरी नृत्य, कला सादर केले. चिमुकल्यांची वेशभूषा व कौतुक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जिजाऊ शाळेने एवढा सुंदर सांस्कृतिक उपक्रम राबवल्याबद्दल शालेय प्रशासनाचे देखील अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव ॲड.दयानंद लोंढाळ यांच्या संकल्पनेतून जिजाऊ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मोहिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्कृष्ट नियोजन केले.