
पत्रकार शिवराज पाटील पवार यांचा जन्म दि. १ जुलै १९८१ सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात लोहा तालुक्यातील पारडी येथे आई सौ.लक्ष्मीबाई पवार, वडील सधन शेतकरी पांडुरंग पाटील पवार यांच्या उदरी जन्म झाला. शिवराज चे चौथी पर्यंतचे शिक्षण जि.प.प्रा.शाळा पारडी येथे तर पाचवी ते बारावी कै.वि.नळगे मा.व उ.मा.वि.लोहा येथून तर बी.ए.पर्यंतचे शिक्षण श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे,एम. ए.मराठी व एम.ए. इतिहास प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड व पिपल्स कॉलेज नांदेड, राष्ट्रमाता अध्यापक महाविद्यालय येथून,नंतर बी.एड्.,बी.लीब.,जी.डी.सी. ऍण्ड ए.अशा विविध उच्च पदव्या घेत कॉलेज जिवनापासूनच विविध सामाजिक कार्याला सुरुवात केली.
चुलते माजी सरपंच कै.संभाजी पाटील पवार, मेव्हणे माजी सरपंच दिगांबर डिकळे,माजी आमदार रोहिदास चव्हाण,माजी नगराध्यक्षा सौ.आशाताई चव्हाण यांच्या सहवासातून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्याला अगदी जवळून पाहिले.त्यांचा आदर्श समोर ठेवून पुढील वाटचालीस सुरूवात केली.अर्धांगिनी सौ.उषाताई पवार यांनी २००३ पासून वेळोवेळी साथही दिली.
नेहरू युवा केंद्र नांदेड येथे राष्ट्रीय सेवा कर्मी, तालुका विधी सेवा प्राधिकरण सदस्य,स्वयं शिक्षण प्रयोग तालुका समन्वयक,जीवनोन्नती अभियानात प्रशिक्षक,साक्षर भारत योजना/अभियानात प्रेरक म्हणून ग्रामस्तरापासून ते राज्य लेवल पर्यंत महत्वाची भुमिका पार पाडली.क्रीडा विभागात उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांची राज्य स्तरावर नोंद ही झालेली आहे.नांदेड जि.म.सह. बँकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करता आली.समाजातील विविध प्रश्न हाताळत अनेकांना न्याय मिळवून दिला.२०१९ ला पत्रकारितेत पदार्पण करून अन्यायाविरूद्ध लेखणीच्या माध्यमातून आजतागायत वाटचाल सुरू आहे.जातीभेद,धर्मपंथ भेदभाव कधीही त्यांनी बघितला नाही.
समाजातील कोणताही राजकीय सामाजिक, विविध विकासात्मक प्रश्न लेखणीच्या माध्यमातून यांनी मार्गी लावलेले दिसून येतात.राज्य भरात नावाजलेल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली चालणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची २०२० मध्ये लोहा येथे शाखा स्थापन केली. त्या संघटनेची लोहा तालुकाध्यक्ष पदाची धुरा बिनविरोध पणे आजही सांभाळत आहेत. संघटनेच्या अधिवेशनासह राबवलेल्या विविध उपक्रमात ते संपूर्ण टीम ला सोबत घेऊन काम करतात.राज्य सल्लागार प्राचार्य वसंत बिरादार पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय संघटक बापू गायखर, जिल्हाध्यक्ष संजय कुमार गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत विविध उपक्रम राबवतात.शिवराज पाटील हे पत्रकार संघाची सलग तिसऱ्यांदा लोहा तालुकाध्यक्ष पदाची धूरा सांभाळत आहेत. दत्ता शेंबाळे, वखार महामंडळ कार्यालय पुणे येथील सेवानिवृत्त अधिकारी बी.एन.सोनटक्के,के एम शेटे, ज्ञानोबा माऊली, यांचेही त्यांना मार्गदर्शन असते.संयमी, उच्चशिक्षित, निर्भीड पत्रकार शिवराज पाटील पवार यांना तमाम चाहत्यांकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
पत्रकार
गोविंद पाटील पवार