
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी शहरातील स्व. साहेबरावजी लेंधे पार्क,सद्गुरू नगर येथे दिनांक २९ जून २०२३ गुरुवार रोजी मानवाधिकार सहायता संघ अंजनगाव सुर्जी शाखेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले असुन,यावेळी विविध प्रकारची वृक्षं लावण्यात आली.ज्याप्रकारे वृक्ष मानवा करिता जेवढे उपयुक्त आहेत,तेवढेच मानवाने सुद्धा वृक्षांचे पालन पोषण करणे मानव हिताकरिता महत्वाचे आहे.सततच्या लोकसंख्या वाढीमुळे लोकांच्या गरजा सुद्धा वाढत आहेत.निसर्गात उपलब्ध साहित्यातून मनुष्य नवीन वस्तूंची निर्मिती करीत असतो.त्यामुळे अपरिहार्य असा ताण निसर्गावर आलेला आहे.हा ताण कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करुन संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.या संकल्पनेतुन समाजाला योग्य संदेश देण्यासाठी मानावाधिकार सहायता संघ प्रयत्नशील राहील असे याप्रसंगी उपस्थित मानवाधिकार सहायता संघटनेच्या सदस्यांनी चर्चेतून व्यक्त केले.
यावेळी मानवधिकार सहायता संघाचे सुनिल माकोडे,गजानन थोरात,गजानन चांदुरकर,श्रीकांत नाथे,सचिन इंगळे,पंकज हिरुळकर,महेंद्र भगत,श्रीकांत धुमाळे,आशिष तोंडे,मयूर वाघमारे,विशाल वाघमारे,अनुराग थोरात,प्रथमेश हाडोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.