
आपण खुलेआम अवैद्य मद्य विक्री ऐकली होती.परंतु कधी ड्राय-डे ला खुलेआम मद्य विक्री ऐकली का?ऐकली असेल परंतु त्यासंबंधी बनविलेल्या नियमांची अंमलबजावणी कितपत होत आहे की नाही?जर होत नसेल तर लगेच याबद्दल भीती न बाळगता आपल्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना कळवा….
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :शहरात आषाढी एकादशी व बकरी ईद या हिंदू-मुस्लिम एकात्मतेच्या पर्वावर शासनाकडून ड्राय-डे घोषित करण्यात आला.मात्र;प्रशासनाच्या मन मर्जीनुसार मद्य प्रेमींकरिता गोड गिफ्ट देत ड्राय-डे च्या दिवशी सुद्धा खुलेआम मद्य विक्री होत असल्याचे दिसुन आले.त्यामुळे शासनाकडूनच सामान्यांना नियम दाखवले जातात की काय? शासनाने ड्राय-डे चे नियम न बनवलेले बरे? शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा त्याकरिता एकीकडे शहरातील चौका-चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तर दुसरीकडे शहरातील दारूची दुकान खुलेआम सुरू या मागचा हेतू काय?यामधून भावी पिढीने काय बोध घ्यावा?असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असून चर्चेत आहेत.
अंजनगाव सुर्जी शहरात आषाढी एकादशी व बकरी ईद या ड्राय-डे च्या दिवशी सुद्धा खुलेआम मद्य विक्री केल्या गेली.शासनाकडून राष्ट्रीय सण,स्वातंत्र्य सैनिक यांच्या सन्मानार्थ असलेले दिवस आणि धार्मिक सणांच्या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवण्यात येतात.याशिवाय काही वेळा कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून एखाद्या विशिष्ट शहरात किंवा राज्यात ड्राय-डे जाहीर केला जातो.तर एखाद्या भागात निवडणुका असल्या,की त्या भागात ड्राय-डे जाहीर केला जातो.कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतला जातो.परंतु ड्राय-डे च्या दिवशी शहरातील मद्य विक्री आड मार्गाने जोरात सुरु होती आणि त्यामुळे शहरात कायदा अंमलात आणण्याची अधिकाऱ्याची मनस्थिती नाही का? अश्या प्रश्नांची नागरिकांनामधे चर्चा आहे…