
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर :आज दि. 30/06/23 रोजी. परमपूजनीय गोळवलकर गुरुजी शैक्षणिक संकुलात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर, प्रमुख पाहुणे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे व कार्यक्रमाला वक्ते म्हणून लाभलेले कीर्तनकार दत्ता विठ्ठल पडलवार महाराज मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विठू- रखुमाईच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाले. पद्य सुरेखा तोटावार यांनी सादर केले. यानंतर वक्त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. संतांनी कशा पद्धतीने समाज प्रबोधन केले याचे उदाहरण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीमधून मुलांना सांगितले. याचबरोबर भारतीय संस्कृती जपवणुकीतील संत यांचे योगदान त्यांनी सांगितले ” संत म्हणजेच देव, देव म्हणजेच संत होय”. असे त्यांनी देवाची व्याख्या केली आणि चांगल्या माणसातूनच संत घडत असतो आणि संत लोकांनाच आपण देवाची उपाधी देतो असतो.असे त्यांनी त्यांच्या वक्त्यातून मुलांना पटवून सांगितले. यानंतर अध्यक्ष समारोपात दमन देगावकर यांनी वारकरी वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या .यानंतर वारकरी वेशभूषेतील मुलांची वारकरी दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपा पांचारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.