
श्रीक्षेत्र माहूर ता, प्र, विनोद भारती)नांदेड जिल्ह्यातील अप्पारावपेठची घटना ताजी असतांनाच दि.29 जून रोजी सायं. साडे सहा वा. सुमारास माहूर शहरात बैलजोडी कुर्बानी साठी घेऊन जात असल्याची माहीती मिळाल्या वरून गौरक्षक प्रद्युम्न उपाख्य सोनू माधव चौधरी ( वय 23 वर्षे )व त्याच्या मित्राने बैल जोडी नेणाऱ्या ईसमास विचारपूस केली, असता सलिम याचेसह इतरांनी लोखडी रॉड, दगड, लाठी काठीने बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतल्याची तक्रार अतिश शंकर राठोड याने दिली.त्यावरून माहूर पोलिसांनी 10 प्रमुख आरोपीसह इतरांवर कलम 11/1 डी 5 अ,5 ब,307 व 395 नुसार गुन्हा नोंद केला आहे.
सायं.6 वा. चे सुमारास प्रद्युम्न माधव चौधरी हा मित्रासह आपल्या व्यायाम शाळेत निघाला होता.त्यावेळी बैलजोडी कुर्बानी करीता नेणाऱ्या संजय किसन गायकवाड यांस त्या दोघांनी विचारपूस केली. त्यावर सदरील बैलजोडीचे दाखले सलीम कुरेशी याच्याकडे आहे, असे त्याने सांगितले.त्यानंतर सलिम कुरेशी,बाबुशा ठेकेदार,आसिफ हसन,सलिम ॲटोवाला,अनिस चिनी ऊर्फ शोयब शेख,एजाज,सोहल शेख, मोईन व ईतर मंडळी तिथे आले, आणि “ईसका बोहोत हो रहा है, ईसको आज खत्म करेंगे” असे म्हणून सलीम ॲटोवालाने लोखंडी रॉड चौधरीच्या डोक्यात घातला. इतरांनीही लाठ्या काठ्या, दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. गंभीर अवस्थेत सोनूला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक इलाज केल्यानंतर त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात जमलेल्या जमावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन बाजार पेठ बंद केली. यावेळी काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे यांनी माहूर गाठले.शुक्रवारीही बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमावाची घोषणाबाजी सुरूच होती. माहूर पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यातील 5 आरोपीना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरु आहे.