
(विकासाची गंगा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार — उपसभापती गोपाळराव बोराडे)….. (इलेक्ट्रॉनिक वजन काटा व वॉटर फिल्टरचा लोकार्पण सोहळा)…. प्रतिनिधी/मंठा /सुरेश ज्ञा. दवणे मंठा बाजार समिती निवडणुकीत सर्व शेतकरी आणि व्यापारी बांधवांना दिलेला वचननामा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती तथा जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी केले. येथील बाजार समितीच्या आवारात इलेक्ट्रॉनिक वजन काटा व वॉटर फिल्टरचा लोकार्पण सोहळा सभापती, उपसभापती व संचालक मंडळाच्या उपस्थितीत शुक्रवार (ता.30) रोजी पार पडला. यावेळी सभापती श्री बोराडे बोलत होते. या कार्यक्रमाला उपसभापती गोपाळराव बोराडे, ॲड. पंकज बोराडे, कल्याणराव खरात, संतोष वरकड, अण्णासाहेब खंदारे, बाबाराव राठोड, पंजाबराव केंधळे, केशव महाराज सरकटे, सचिन राठोड, डॉ.डी.जी. काकडे, ज्येष्ठ नेते अंकुशराव अवचार, किसनराव मोरे, मा. सभापती संभाजीराजे खंदारे, अजय अवचार, मधुकर काकडे, श्रीरंगअण्णा खरात, प्रदीप बोराडे, नितीन राठोड, जे.के. कुरेशी, अरुण वाघमारे, विकास सूर्यवंशी, बाजखा पठाण, शरद बोराडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना सभापती ए.जे.बोराडे म्हणाले की, सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बाजार समिती ही टप्प्याटप्प्याने विकासाचे सर्व प्रश्न सोडविणार असून “बोलणे कमी आणि काम जास्त” या उक्तीप्रमाणे वचननाम्यात दिलेला शब्द पूर्ण करणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी, शेतकरी आणि व्यापारी बांधवांनी दिलेल्या विकासाच्या प्रस्तावावर योग्य निर्णय घेऊन विकासाची गंगा तालुक्यात पोहोचविणार अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक अण्णासाहेब खंदारे यांनी, मंठा तालुक्यात भाजप विरोधी मोट एकत्र बांधली असून भविष्यात महाविकास आघाडीची ही वज्रमूठ तालुक्याच्या विकासाची नांदी ठरेल असे सांगितले. या कार्यक्रमाला व्यापारी रणजीत दांगट, पुंजाराम शिंदे, मारोतराव बोराडे, गणेश उन्हाळे, दत्ता हातकडके, मुसा भाई कुरेशी, लक्ष्मण बोराडे,गणेश सराफ, शेखर बागल, प्रभाकर शेरे, बालासाहेब मोरे, रामेश्वर शिंदे, पप्पू दायमा, आसाराम बोराडे, विष्णुपंत खराबे, अनु काकडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व आडत, भुसार व्यापारी, शेतकरी हमाल मापाडी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बाजार समितीचे कर्मचारी प्र.सचिव रमेश बोराडे, बालासाहेब कुलकर्णी, शाम हजारे, अजय जाधव, रावसाहेब मोरे, संभाजी बोराडे, किरण गोरे, शेख वाजीद यांनी परिश्रम घेतले……….. “चौकट” 1) बोलणे कमी कृती जास्त – सभापती ए.जे.बोराडे….. बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या वचन नाम्याची पूर्तता म्हणून पहिल्या टप्प्यात इलेक्ट्रॉनिक वजन काटा व वॉटर फिल्टरची सुरुवात केली. आगामी काळात सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने बोलणे कमी आणि कृती जास्त करून दाखविणार असा विश्वास श्री बोराडे यांनी व्यक्त केला…. विकासाची गंगा तालुक्यात पोहोचविणार उपसभापती गोपाळराव बोराडे… ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है ! या पद्धतीने शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यात येत असून विकासाची गंगा तालुक्यात पोहोचविणार अशी ग्वाही उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी दिली. शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समतोल साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.