
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
गंगापूर : नगर परिषद मार्फत गंगापूर शहरात होणार पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावे तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मोठे भगदाड पाडून पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या पदाधिकारी अभियंता अजय व्यवहारे यांच्या वर तात्काळ कारवाही कारवाई करण्यात यावी न झाल्यास संदृशील मार्गाने आंदोलन करण्यात येईल. गंगापूर शहरात पाणीपुरवठा पाच वर्षांपूर्वी दोन दिवसा आड होत होता, परंतु गेल्या ५ वर्षापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. तो आता दर ८ ते १५ दिवसांनीच होत आहे. त्यास तत्कालीन पदाधिकारी व पाणीपुरवठा अभियंता हेच जबाबदार आहेत त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या खाली पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल येथील विहिरीत मोठे भगदाड पाडले त्यामुळे संपूर्ण नदी पात्रातील गाळ हा विहिरीत जमा झाला व त्यामुळे विहीर पूर्णपणे गाळाणे भरून गेलेली आहे. त्यामुळे विहिरीत पाणी येत नाही त्यामुळे गंगापूर शहरात ११ दिवसा आड येणारे पाणी पूर्णपणे बंद होऊन मागील ५ वर्षात पाणीपुरवठा हा ८ ते १५ दिवसांनी होत आहे. विस्कळीत झालेल्या पाणीपुरठ्याला तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता हे जवाबदार आहेत तसेच त्यांना आदेश देणारे पदाधिकारी सुद्धा तिकेच जबाबदार आहेत तरी तहसीलदार साहेब यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन चौकशी करून श्री अजय व्यवहारे व पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाही करावी तसेच त्या विहिरीचे भगदाड पाडलेला आहे त्या गोष्टीचा विचार करून जॅकवेल वरील विहिरीचे काम करून तेथील गाळ उपसा करून गंगापूर शहराला पाणी पुरवठा सुरळीत करावा व नागरिकांना दर दिवशी पाणी पुरवठा करावा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक ते राजीव गांधी चौक हा रस्ता वर्दळीचा असून एस. टी. बस मुंबई नाशिक येथील मोठ्या शहरातून ये-जा करतात हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून त्याचे काम ताबडतोब करण्यात यावे सदरील रस्त्यावरून शहरातील नामांकित शाळेत पायी जाणार्या व सायकलवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते सदर रस्त्यावर एक एस. टी. बस जाईल एवढा रस्ता आहे त्या बाजूला लगेच भुयारी गटार योजनेचे चेंबर आहे रस्त्यावरच उंच बांधलेले आहे त्या चेंबर ला एखादा विध्यार्थी किंव्हा पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मोठा अपघात होणाची शक्यता नाकारता येत नाही वरील सर्व कामे ताबडतोब हाती घेण्यात यावी यावेळी सुवर्णा जाधव, संगीता वाघ, सुनीता खंडागळे, अश्विनी नेमाडे, रेखा राजपूत, संगीता खोचे, तारा पदार, रुक्मिणी नवले, सोनाली दारुंटे ज्योती सावंत सुनिता जोजे, विजया भड, ललिता त्रंबके, संगीता जाधव, लता गात, ज्योती मराठी, मीरा फुलारे, कविता किरकाळे, सुशीला गायके, हिरा गायके, रेखा नजन, मनीषा पवार, हिराबाई परदेशी, शोभाबाई राजपूत, लीला दहातोंडे, भिजला साबणे, पाटे बाई यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…