
दैनिक चालू वार्ता
बल्लारपूर प्रतिनिधी कमलेश नेवारे
बल्लारपूर : रक्ताची गरज जगभरात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात किमान एकदा रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होते. म्हणून रक्तदान करणे टाळण्याचे कोणतेही कारण नाही.
शहरातील रहिवासी चेतन मंगल यांची पकृती बरी नसल्याने व त्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असल्याने त्यांच्या मातोश्री ने बल्लारपूर शहरातील समाजसेवी संस्था श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांच्याशी संपर्क साधला. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांनी परिस्थिती लक्षात घेता क्षणाचाही विलंब न करता तात्काळ कर्मभूमी संस्थेचे अध्यक्ष राहुल मोरे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना परिस्थिती लक्षात आणून दिली. राहुल मोरे हें स्वतःच चंद्रपूर मधील अंकुर ब्लड बँक येथे जाऊन रक्तदान केले. व चेतन मंगल या रुग्णाचे प्राण वाचविले. या संकटाचा काळात जनतेला श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर या संस्थेची गरज भासली तसेंच भविष्यातही आपली संस्था समाजसेवेला नेहमी अग्रेसर असेल व गरजून्ना मदत पोहचवीत राहणार असे आश्वासन देण्यात आले.