दै.चालु वार्ता परंडा प्रतिनीधी
धनंजय गोफणे
परंडा-महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती नंदकुमार नगरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,अमोल बावणे नागपुर जिल्हा अध्यक्ष,कचरुजी भारस्कर अध्यक्ष विदर्भ, प्रदेश,प्रकाश लोणारे संस्थापक महाराष्ट्र राज्य यांची दि.३०/६/२३ या दिवशी बैठक पार पडली या बैठकी मध्ये धाराशिव जिल्ह्यामधुन महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी दिनकर चिंतामणी नगरे यांची निवड करण्यात आली तसेच मच्छिमाऱ्यांची धेय . धोरण समस्या व उद्देश या अनुसरून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
तसेच महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दिनकर नगरे यांची निवड झाल्या बद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अँड सुजित देवकते यांच्या हस्ते फेटा बांधून पुष्पहार घालुन पेढे वाटून सत्कार करण्यात आला सत्कार समारंभाचे सुत्रसंचालन श्रीराम पाटील यांनी केले व या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर दत्तात्रय खैरे, पोलिस पाटील संघटना जिल्हा उपाध्यक्ष बिभीषण खरसडे, वसंतराव फंड, श्रीराम पाटील ,पांडुरंग कोकाटे ,नंदकुमार शिदे समता परिषद ता अध्यक्ष या सर्वांनी नगरे यांना शुभेच्छांचा वर्षाव कौतुक करित पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अँड सुजित देवकते यांनी सर्वांचे आभार मानले…
