
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी
माधव गोटमवाड
कंधार : कंधार तालुक्यातील मौजे सावरगाव नि. येथील योगीराज प्रतिष्ठान वर्ताळा तांडा द्वारा संचलित स्टार पब्लिक स्कूलच्या वतीने चिमुकल्या बाल कलाकारांनी पंढरपूर आषाढी एकादशी निमित्य वारकरी वेशभूषा परिधान करून गावातील मुख्य रस्त्याने टाळ मृदंगाच्या, लेझीमच्या, विठ्ठलाच्या गजरात पायी वारी दिंडी शाळेपासून महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत काढली. बाल चिमुकल्यांनी, विद्यार्थ्यांनी काढलेली आषाढी पायीवारी दिंडी सोहळा पाहण्यासाठी सावरगाव व परिसरातील भाविक भक्तांची, नागरिकांची व पालकांची चांगलीच उपस्थिती लाभली होती.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढलेली पायी दिंडी सोहळा पाहून उपस्थित सर्व पालक व परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी पायी दिंडी सोहळ्यात गावातील भजनी मंडळ, गावातील नागरिक, पालक, विद्यार्थी,शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते. दिंडी सोहळ्याचे आयोजन या शाळेचे सचिव/प्राचार्य संजय जी. पवार, सौ.वैशाली एस. पवार, कु. प्रियदर्शना चव्हाण, सौ.वर्षा तर्फेवाड, सौ.मुखेडकर, कु.अर्चना मॅडम, ज्ञानोबा पा. वडजे, रमेश राठोड, अतुल किनवाड, तातेराव पा.वडजे, आदींनी परिश्रम घेतले.