दै.चालू वार्ता नांदेड
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव..
नांदेड – श्री शिवाजी प्राथमिक , माथ्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिकनगर , नवीन कौठा नांदेड येथे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक व संचालक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,माजी खासदार व आमदार, शिक्षणमहर्षी, सुग्या मुग्याचे , उपेक्षितांचे व वंचित शोषितांचे कैवारी , लोकनेते आदरणीय दिवंगत डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचा १०२ वा जयंती समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर , नवीन कौठा नांदेड येथे 04 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने प्राथमिक शाळा , हायस्कूल व कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , तसेच एस.एस.सी. व एच.एस. सी. बोर्ड परीक्षेतून शाळा व कॉलेजमधून प्रथम 90% च्या वर गुण घेऊन प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व शाळेचे नाव उज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शर्करातुला जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सचिव , ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब हे राहणार असून जयंती समारंभाचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक माननीय देविदास फुलारी यांच्या उपस्थिती सह प्रमुख पाहुणे माननीय प्रा वैजनाथरावजी कुरुडे सर ( संस्था सदस्य ) तसेच शालेय समिती सदस्य मा. एम.पी. कुरुडे सर व दुसरे शालेय समिती सदस्य मा. सूर्यकांत रुख्माजी कावळे सर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार असून या कार्यक्रमास वेगवेगळ्या वृत्तपत्राचे पत्रकार बंधू सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची वेळ दुपारी 12 : 35 वाजताची असून पावसाची संभाव्य दक्षता घेऊन सौभद्र मंगल कार्यालय चैतन्य नगर नांदेड या ठिकाणी जयंती समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. .या जयंती समारंभाचे आयोजन शालेय समिती सदस्य माननीय सूर्यकांत कावळे सर शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर भाऊ गुरुनाथराव कुरुडे , उप मुख्याध्यापक डी. पी. कदम उपप्राचार्य प्रा.डॉक्टर एम.एन. शिंदे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले , शाळेचे पर्यवेक्षक श्री सदानंद नळगे व श्री शिवराज पवळे , प्राथमिकचे पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे , शहाजी आहेर , शालेय समिती सदस्य ( शिक्षकेतर ) इंद्रजीत बुरपल्ले , कौठा विभागाचे इन्चार्ज जमील माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज चे सांस्कृतिक विभाग प्रमुख तसेच सहशिक्षक व्यंकटराव उपासे ,एस.एम. पारेकर , क्रीडाशिक्षक सुशील कुरुडे व प्राथमिक , माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे. .04 जुलै 2023 मंगळवार रोजी सौभद्र मंगल कार्यालय चैतन्य नगर नांदेड येथे दुपारी ठीक 12:35 वाजता नांदेड व नांदेड परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी तसेच शैक्षणिक , सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन व विनंती श्री शिवाजी प्रार्थमिक , माध्यमिक व जुनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेडच्या शालेय प्रशासनाच्या व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
