प्रतिनिधी स्वाती हडकर
चिपळूण : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्षपदी निसार शेख, कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग, उपाध्यक्षपदी सचिन कांबळे, सचिवपदी शकील तांबे, सहसचिवपदी हेमंत चव्हाण, खजिनदारपदी कृष्णकांत साळगावकर आणि सहखजिनदारपदी स्वाती हडकर यांची निवड करण्यात आली आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन संघटनेची ताकद अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष मिलिंद आष्टीकर तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली.
या वेळी उपाध्यक्ष हेमंत वणजु, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर आणि डिजिटल मीडिया परिषद रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकारिणी सदस्य म्हणून बाळू कोकाटे, राजेश जाधव, सुरेश पवार, शाहीद खेरटकर आणि जमालुद्दीन बंदरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मराठी पत्रकार परिषद चिपळूण शाखेचे समीर जाधव आणि नागेश पाटील हेही उपस्थित होते.
डिजिटल माध्यमांतील पत्रकारांचे प्रश्न सोडविणे, संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविणे आणि पत्रकार बांधवांमध्ये समन्वय वाढविणे यासाठी नवनियुक्त कार्यकारिणी प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर चिपळूणमधील पत्रकारितेच्या वर्तुळातून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
