
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागे बाबत सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोकरदन तालुक्याच्या वतीने पाठींबा देण्यात आला.
दैनिक चालू वार्ता.
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम भोकरदन.
शिक्षण विभागाकडून काही वर्षापासून रिक्त पदे भरण्याबाबत प्रणालीमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्या नाहीत. राज्यात विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण भागांतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील शिक्षक भरतीमध्ये अनेक प्रवर्गाला काही जिल्ह्यांत जागा कमी होत्या. जागा उपलब्ध नव्हत्या. परंतु भोकरदन तालुक्यातील ग्रामिण भागातील गावामध्ये 247 पदे रिक्त आहेत आगामी भरती प्रक्रियेत पदे न भरण्यासाठीचे असे प्रकार टाळले नाही पाहिजे असे विद्यार्थ्यांचे व पालकांचे म्हणणे आहे.
याचा परिणाम मुलाच्या भवितव्यावर होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळण्यात यामुळे व्यत्यय येत आहे. शिक्षकांची कारकुनी कामे वाढली आहेत. शासनाच्या विविध योजना, अभियानाचा ताणही शिक्षकांवर राहतोच. यामुळे तसेही विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा इतर कामांमध्येच शिक्षकांचा जास्त वेळ जातो. अनेक शाळांवरील मुख्याध्यापक पद रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. तसेच मुख्याध्यापक पदाचे कामकाज शिक्षकांना करावे लागत असल्याने अशी कामे करणाऱ्या शिक्षकांना अध्यापन करण्यास वेळ मिळत नाही. शिरसगाव वाघरुळ.दानापुर, वालसावंगी, फतेपूर, राजूर,चिंचोली, केदरखेडा,कठोरा बाजार, बरंजळा सांबळे,बरंजळा लोखंडे, भागात राहणार्या वाड्या-वस्त्यांमधिल गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळताना दिसत नाही. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठांनी लक्ष देऊन रिक्त पदे भरण्याची गरज आहे.
सदरील जालना जिल्हा भोकरदन तालुका येथिल रिक्त शिक्षक पदे लवकरच भरण्यात यावेत.अन्यथा गटशिक्षणाधिकारी कार्यालय समोरील धरणेठिय्या आंदोलन मागे घेणार नाहीत आशी मागणी बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नारायण लोखंडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय पाटील चिंचपुरे यांच्या कडून शासनास इशारा देण्यात आला आहेत.