
दहेंद्री गावातील नागरिकांच्या मनात कुजबुजतोय प्रश्न…
दै.चालु वार्ता
ता.प्रतिनिधी चिखलदरा
प्रवीण मुंडे
अमरावती (चिखलदरा) : चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेंद्री गावातील सन २०२२ साली पुलाचे निर्माण करण्यात आले होते.पुलाच्या कडेला बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंती कमी उंचीच्या बांधल्या गेल्याने आणि रस्ता बांधकामात वापरल्या गेलेले साहित्य कमी वापल्याने तर गावातील दोन्ही रस्त्यांना अडथळा तर निर्माण होत असून यात प्रशासन व इंजिनिअरचे साटेलोटे तर नाही ना? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
सद्यपरिस्थितीत पावसाळा सुरू झाला असून रस्त्याच्या मधोमध पाणी तुंबल्याने व तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण तर होतच आहे.परंतु डास,माश्यांचा सुद्धा त्रास वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचत नसून तसेच घरी परत येण्याकरिता पालकांना पाल्यांची चिंता वाढली आहे.त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता जलतरण पटूचे शिक्षण घ्यावे लागणार की काय? असा प्रश्न विद्यार्थांना पडला असून तात्काळ येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा असे दहेंद्री गावातील नागरिकांची शासनाला मागणी आहे…