देगलूर मा.नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांच्या कल्पकतेतून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:कल्पनेच्या पलीकडील तथा गुगल पेक्षाही सरस असे एक ते दहा हजार पर्यंतचे पाढे तोंडपाठ म्हणणे, इंग्रजीची पुस्तक मराठीतून वाचणे व मराठीचे पुस्तक इंग्रजीतून वाचणे व कोणतेही गणित पॉईंट मधून एका सेकंदात तोंडी सोडवणे अशी अफाट विद्वत्तेची कला अंगी असलेले श्याम शिंदे यांनी शिक्षण हे एक मोठे ब्रह्मास्त्र आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने यशाची तीन सूत्रे अर्थात संघर्ष,सातत्य,चिकाटी अंगी जोपासल्यास नक्कीच आयुष्यात यश प्राप्त होते असा कानमंत्र मेडिकलच्या सेकंड इयरला असलेल्या तथा गुगल बॉय म्हणून ओळख असलेल्या श्याम शिंदे या विद्यार्थ्याने साधना शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला. तालुक्यातील ग्रामीण भागातील बेंबरा येथील रहिवासी असलेले शिंदे कुटुंबातील श्याम सुरेशराव शिंदे हा विद्यार्थी बालपणापासून अतिशय हुशार असून त्याने विविध स्पर्धात्मक परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक पटकवायचा बारावी नंतर बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. या गुगल बॉय अर्थात श्याम शिंदे याची विद्वत्तेची चर्चा परिसरात चर्चिली जात आहे.
याच दरम्यान माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांना हाणेगाव येथील एका कार्यक्रमात त्याच्या या कलेची चर्चा कानी पडताच त्यांनी आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी साधना शाळेत श्याम शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला.
त्या गुगल बॉय अर्थात अफाट विद्वत्ता असलेल्या श्याम सुरेशराव शिंदे यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेतल्यास वावगे ठरणार नाही हे विशेष होय…
