दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर हे गेल्या काही दिवसा पासून देगलूर तालुक्यातील येडूर रमतापूर बिजलवाडी खुतमापूर हाणेगाव वझर कोकलगाव मानूर बेंबरा समोर भूतन हिप्परगा किनी माळेगाव मरतोळी कोट कलुर हनुमान हिप्परगा सुंडगी तूपशेळगाव अशा विविध गावांमध्ये भेटी देऊन गावातील विविध समस्या जाणून घेतल्या काही प्रश्नांची संबंधित अधिकाऱ्याना फोन करून तात्काळ सोडवण्याच्या सूचना केल्या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या विविध स्थानिक विकास कामाचे भूमिपूजन व लोकअर्पण करण्यात आले या दौऱ्यामध्ये सर्व काँग्रेस कार्यकर्ते व त्या त्या सर्कल मधील सर्व प्रतिष्ठित मान्यवर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
